वय १०६ वर्षीय आजीने केले उमरी नगर परिषद करिता केले मतदान

उमरी – नांदेड जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायत करिता आज दि. २ डिसेंबर रोजी मतदान करण्यात येत आहे. उमरी नगर परिषद येथील श्री अहिल्याबाई होळकर सभागृह येथे पद्मशाली समाजातील प्रतिष्ठित व वयोवृद्ध आजी शशिकलाबाई पोशट्टी टिप्रेसवार १०६ वर्ष, प्रतिष्ठित व्यापारी श्री बालाजी टिप्रेसवार यांच्या मातोश्री,आरोग्य सेवेतील हिवताप विभागाचे राज्य पदाधिकारी व नातू सत्यजीत टिप्रेसवार, व्यवसायीक नातू संदीप टिप्रेसवार, शिक्षक महेश टिप्रेसवार, चंदनापुरी ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संजीवनी टिप्रेसवार-सिरसुलवार नात ह्या मतदासाठी आले, नात सून सौ रंजना सत्यजीत टिप्रेसवार, सौ मनीषा संदीप टिप्रेसवार, सौ अरुणा महेश टिप्रेसवार यांनी उमरी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!