मतदानासाठी प्रशासन सज्ज

नांदेड -जिल्ह्यातील ११ नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 या कालावधीत मतदान करता येणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा व कुंडलवाडी या नगरपरिषद/नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध  करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभुमीवर नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.  निवडणुकीची मतमोजणी बुधवार 3 डिसेंबर, 2025 रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!