भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड –  जगातील 243 देशाच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ लोकशाही असून भारतातील तळागळातील शेवटच्या माणसासाठी विकासात्मदृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशाची अखंडता अबाधित ठेवून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही मुल्ये राज्यघटनेने प्रदान केलेली असून भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा होय, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिकक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.26 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता 76 वा भारतीय संविधान दिन (अमृत महोत्सवी वर्ष) म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या संविधान दिन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
सर्वप्रथम विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की, भारतरत्न प.पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 22 अंतरराष्ट्रीय देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून आपल्या जीवनात 40 हजार पुस्तकांचे (ग्रंथाचे) वाचन करून दोन वर्षे अकरा महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत घेवून आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर राज्यघटनेत 395 कलमे 12 परिशिष्ठ सामावुन महान असा भारतीय संविधान ग्रंथ या भारत देशाला सुपूर्द केला म्हणून आज प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधान रक्षणाप्रती सजग राहुन संविधानाचे वाचन करणे ही काळाची गरज आहे, असेही ते शेवटी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले. यावेळी मा.श्री.मिलिंद कुमार सोनाळे यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्व कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांना उद्देशिकेची सामुहिकरित्या शपथ दिली.  या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णु हरकळ, आगार व्यवस्थापक मिलींदकुमार सोनाळे, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, लेखाकार सतिश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहर माळगे, विनायक चव्हाण, वरिश्ठ लिपीक नितीन मांजरमकर, सुनिल मोरे, सौ.श्वेता तेलेवार, वैशाली कोकणे, शिल्पा ढवळे, मीना कदम, कृष्णा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी रामप आगारातील कष्टकरी-कामगार कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!