नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी सन 2023 मध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या दोन जणांना अटक करून सध्या त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशाने तुरूंंगात केली आहे.
सन 2023 मध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेवर आकाश साहेबराव सुर्यवंशी (26) रा.दाभड आणि राजेश उर्फ राजू देवराव बगाटे (25) रा.तरोडा (बु) या दोघांनी अत्याचार केला होता. पण ते सापडतच नव्हते. काल दि.29 नोव्हेंबर रोजी पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे, महेश माळी, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार विशाल माळवे, गजानन किडे, विष्णुकांत मुंडे, राहुल लाठकर, नागनाथ चापके, देवसिंग सिंगल, राजीव घुले, आदनान पठाण आणि अंकुश कांबळे यांनी या फरार असलेल्या दोघांना अटक केली आणि न्यायालयाने आदेश दिल्यानंतर या दोघांची रवानगी तुरूंगात केली आहे.
तिन वर्षापुर्वी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे तुरूंगात
