नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात सहकुटूंब सन्मान करून निरोप देण्यात आला.

नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालयात कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरिक्षक विजय मारोतराव राऊतवाड आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ईश्र्वर महादुअप्पा दासे हे नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेस सेवानिवृत्त होणार होते. पण 30 तारेखला रविवार असल्यामुळे त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ 29 नोव्हेंबर रोजीच पार पडला. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांचा सहकुटूंब सन्मान केला. या समारंभात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक जगदीश मंडलवार, जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरिक्षक ज.ए.गायकवाड यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रुक्मीन कानगुले यांनी केले. पोलीस अंमलदार मारोती कांबळे, नरेंद्र राठोड आणि सविता भिमलवाड यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
