सैराटसारखा प्रेमप्रसंग, पण शेवट अधिक वेदनादायक; सक्षम ताटे हत्याप्रकरणातील पाच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
- नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम गौतम ताटे (वय 20) या अनुसूचित समाजाच्या तरुणाच्या हत्येने शहर हादरले आहे. प्रेमसंबंधांना कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे ही हत्या घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी त्यातील पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रेमसंबंधांना विरोध—आणि घडली हत्या
- सक्षम साठे याचे मामिडवार कुटुंबातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केल्यामुळे सक्षमवर गंभीर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत धक्कादायक असून प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा क्रमांक 360/2025 दाखल करण्यात आला आहे.
सहा आरोपींना अटक
- या प्रकरणात पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे..
- जयश्री मदनसिंह ठाकूर उर्फ मामिडवार (वय 43)
- गजानन बालाजीराव मामिडवार (वय 44)
- साहिल उपसनी मदनसिंह ठाकूर उर्फ मामिडवार (वय 25), रा. सिद्धनाथपुरी चौफळा, नांदेड
- सोमेश सुभाष लखे (वय 20), रा. भावेश्वरनगर, मरघाट चौफळा, नांदेड
- वेदांत अशोक कुंदेकरे(कुळदेवकर)(वय 18 वर्ष 7 महिने) रा.शंकराचार्य मठाजवळ सिध्दनाथपुरी चौफाळा नांदेड
- अल्पवयीन बालक – याची रवानगी बाल न्यायालयात करण्यात आली.
पोलिस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या पथकाने आज आरोपींना न्यायालयात हजर केले. अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मोहम्मद अब्बास यांनी पोलीस कोठडीची गरज सविस्तर स्पष्ट केली. न्यायालयाने पाच आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
भावनिक क्षण—‘सैराट’ची आठवण करून देणारी घटना
- या घटनेत आणखी एक हृदयद्रावक प्रसंग घडला. सक्षमच्या प्रेयसीने त्याच्या अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत जाऊन सक्षमच्या प्रेताचे हाताने आपल्या कपाळावर कुंकू लावले आणि त्याच हाताने मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातले. हा प्रसंग पाहणाऱ्यांना ‘सैराट’ची आठवण करून देणारा होता; मात्र सैराटपेक्षा हा शेवट अधिक वेदनादाय ककारण येथे फक्त प्रियकराचा मृत्यु झाला.या तरुणीने स्वतःच्या आई-वडिलांविरुद्ध व भावाविरुद्ध पोलिसांकडे जबाब दिल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे.समाजाला हादरवून टाकणारी घटना
- प्रेमसंबंधांचा तिढा, जातीय द्वेषाची छाया, आणि एका तरुणाचा अकाली मृत्यू या सगळ्यांनी नांदेड हादरून गेले आहे. एका निष्पाप युवकाचा जीव अशा प्रकरणात जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
- संबंधित बातमी ….
