नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी (उत्तर) पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक सुभाष काटकांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे (उत्तर) विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी कॉंग्रेस पक्षाची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत जिल्हा संघटकपदी सुभाष काटकांबळे यांची निवड करण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष व माजी आ.हणमंत पाटील बेटमोगरेकर, कॉंग्रेस कमिटीचे (उत्तर) जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.यशपाल भिंगे, ऍड.सुरेंद्र घोडजकर, डॉ.रेखा चव्हाण, डॉ.श्रावण रॅपनवाड, माजी महापौर तथा शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, ऍड.निलेश पावडे, आनंद चव्हाण, प्रफुल्ल सावंत यांचे सुभाष काटकांबळे यांनी निवड केल्याबद्दल आभार मानले. काटकांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.
कॉंग्रेसच्या जिल्हा संघटकपदी सुभाष काटकांबळे
