नांदेड – समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुने, सहाय्यक लेखाधिकारी राहूल शेजुल, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण, संजय कदम तसेच अशोक गोडबोले, गणेश तादलापूरकर, (प्रदेश अध्यक्ष संविधान बचाव समिती), भगवान ढगे, भिमराव हटकर, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले .
या संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोलीगेट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत संविधान रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी कार्याक्रमाचे प्रास्तावीकात भारतीय राज्य घटना ही जगातील सर्व श्रेष्ठ राज्यघटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेले अधिकार व कर्तव्य याचे पालन करावे असे मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे म्हणाले की, समता, न्याय, बंधूता धर्मनिरपेक्षता आणि समानता या संविधान मुल्याची जोपासना प्रत्येक नागरीकांनी केली पाहीजे असे मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनीगीरे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे फ्रेम देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील समाज भुषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे फ्रेम देवून गौरव करण्यात आला.
समाज कल्याण कार्यालय, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळाचे व्यवस्थापक, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व स्काऊट गाईड व एन.एसी.सी. चे शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे समतादूत असे एकूण जवळपास 1200 विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी, नागरीकांची उपस्थिती होती.
या संविधान रॅलीमध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक, बँड पथक संच यांनी देशभक्ती गिते सादर केले. या संविधान रॅलीमध्ये केंब्रीज विद्यालय, आंध्रा समिती तेलगु विद्यालय, प्रतिभा निकेतन हायस्कुल, गुजराथी हायस्कुल, पंचशिल विद्यालय, गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शांती निकेतन पब्लीक स्कुल, ऑक्सफर्ड इंटरनॅशलन स्कुलचे शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीस सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून पाणी बॉटल, केळी व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. या संविधान रॅलीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
