नांदेड(प्रतिनिधी)-मौजे किरोडा ता.लोहा येथे एका घरात घुसून वयस्कर महिलेला गंभीर दु:खापत करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 87 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे दरोडेखोरांनी चोरून नेले आहेत. उमरी येथील एका बेन्टेस ज्वेलरी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 50 हजारांचा ऐवज लांबविला आहे. तहसील कार्यालय किनवट येथून पासींग क्रमंाक नसलेला 3 लाख रुपये किंमतीचा ट्रक्टर चोरीला गेला आहे.
ज्ञानेश्र्वर चंदु बारोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे किरोडा ता.लोहा येथे त्यांचे घर आहे. 23 नोव्हेंबरच्या रात्री 11 ते 24 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजेदरम्यान त्यांच्या घरात दरोडेखोर घुसले आणि त्यांच्या आईला गंभीर दु:खापत करून त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिणे एकूण 1 लाख 87 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहेत. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 369/2025 प्रमाणे दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
सत्वशिला शिवाजी चरकेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 20 नोव्हेंबर सकाळी 11 वाजेदरम्यान त्यांच्या मालकीचे अंबी ज्वेलर्स हे बेनटेक्स ज्वेलरीचे दुकान फोडून चोरट्यांनी 50 हजारांचा ऐवज नेला आहे. उमरी पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 352/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार आलेवार अधिक तपास करीत आहेत.
तहसील कार्यालय किनवट येथील कारकुन विजय रामेश्र्वर सुरोसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तहसील कार्यालयात पासींग क्रमांक नसलेला एक सोनालीका कंपनीचा ट्रक्टर कार्यवाहीसाठी लावलेला होता. हा ट्रक्टर 22 नोव्हेंबरच्या रात्री 8 ते 23 नोव्हेंबरच्या सकाळी 11 वाजेदरम्यान कोणी तरी चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी या घटनेनुसार गुन्हा क्रमांक 318/2025 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार सिरमनवार अधिक तपास करीत आहेत.
मौजे किरोडा ता.लोहा येथे दरोडा; उमरी येथे बेनटेक्स ज्वेलरीचे दुकान फोडले; किनवट तहसील कार्यालयातून ट्रक्टर चोरीला गेला
