पोलीस जीवनात खेळांचे महत्व अपरंपार-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या जीवनात खेळांचे महत्व अशा पध्दतीने महत्वाचे आहे की, आपल्या कामाच्या ओघात आलेल्या अनेक त्रासदायक घटनांना आपण खेळांच्या माध्यमातून विसरुन जातो. फक्त स्पर्धापुरते खेळ शिल्लक न राहता दररोजच्या जीवनात खेळांचा अवलंब झाला तर आपल्या जीवनातील अनेक त्रास गायब होतात असे प्रतिपादन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले. या क्रिडा स्पर्धेमध्ये नांदेड जिल्हा पोलीस संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. परभणी दुसऱ्या स्थानावर राहिले.
काल दि.25 नोव्हेंबर रोजी परभणी येथे 30 व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा 2025 च्या बक्षीस वितरण समारंभात शहाजी उमाप बोलत होते. या कार्यक्रमात परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे, परभणीचे अपर पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल, नांदेडच्यावतीने अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, लातूरचे पोलीस उपअधिक्षक सागर, परभणीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ, परभणीचे गृहपोलीस उपअधिक्षक अनिरुध्द काकडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना शहाजी उमाप म्हणाले मी 25 वर्षाअगोदर परभणी जिल्ह्यात परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक म्हणून माझ्या पोलीस जीवनाची सुरुवात केलेली आहे. त्या वर्षांमधील प्रसंग सांगतांना हेच ते मैदान येथून सुरूवात करून घडलेले काही प्रसंग सांगितले. जेंव्हा आपण कामाच्या ओघात घरी जातो तेंव्हा आपल्या मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी खेळ हे अत्यंत महत्वाचे असल्याचा सल्ला शहाजी उमाप यांनी पोलीसांना दिला. या पोलीस स्पर्धेमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांचे शेकडो महिला-पुरूष पोलीस खेळाडू सहभागी झाले होते.


परभणी येथील विठ्ठल वाघ याने उत्कृष्ट मैदानी खेळाडू म्हणून आपले नराव कोरले तर हिंगोलीच्या सुनिता जाधव यांनी सर्वोत्कृष्ट मैदानी खेळाडू म्हणून आपल्या नावाची गर्जना केली. 100 मिटर धावण्याच्या स्पर्धांमध्ये हिंगोलीच्या सुनिता जाधव-प्रथम, परभणीच्या नैना वाघ-द्वितीय आणि नांदेड येथील रोहिणी चारले तृतिय स्थानावर राहिल्या. 100 मिटर पुरूष धावणे या स्पर्धेत परभणी विठ्ठल वाघ-प्रथम, नांदेडचे धनंजय तुपे-द्वितीय आणि परभणीचे कृष्णा मुंडे तृतीय स्थानावर राहिले.
सांगीक खेळांमध्ये खाकी पुरूष प्रथम-नांदेड, द्वितीय-परभणी, तृतीय-लातूर, चतुर्थ-हिंगोली, फुटबॉल पुरूष-प्रथम परभणी, द्वितीय-हिंगोली, तृतीय-नांदेड, चतुर्थ-हिंगोली, वॉलीबॉल पुरूष-प्रथम लातूर, द्वितीय-नांदेड, तृतीय-परभणी, चतुर्थ–हिंगोली, बास्केट बॉल पुरूष-प्रथम-नांदेड, द्वितीय-परभणी, तृतीय-लातूर, हॅंड बॉल पुरूष- प्रथम नांदेड, द्वितीय-लातूर, तृतिय-परभणी, चतुर्थ-हिंगोली, कबडी पुरूष-प्रथम परभणी, द्वितीय-लातूर, तृतिय- नांदेड.


क्रॉसकंट्री पुरूष प्रथम परभणी(पोलीस शिपाई गडमल), द्वितीय-परभणी(पोलीस शिपाई कृष्णा कोंढरे), तृतीय-परभणी(पोलीस शिपाई रविंद्र गवते). क्रॉसकंट्री महिला-प्रथम परभणी(हिना शेख), द्वितीय नांदेड(ऋतुजा टिमकेकर), तृतीय नांदेड(वर्षा सुपारे)
वॉलीबॉल महिला-प्रथम परभणी, द्वितीय-नांदेड, तृतीय लातूर, चतुर्थ-हिंगोली, कबडी महिला प्रथम-नांदेड, द्वितीय-परभणी, तृतीय-लातूर, चतुर्थ-हिंगोली, खो-खो महिला प्रथम-परभणी, द्वितीय-नांदेड, तृतीय-लातूर.
या पोलीस परिक्षेत्रीय स्पर्धांमध्ये मैदानी स्पर्धांचे पंचप्रमुख रणजित काकडे व इतर कैलास टेहरे, कैलास माने, संभाजी शेवटे, कल्याण पोले, विश्र्वास पाटील, ज्ञानेश्र्वर रेंगे, यमनाजी भालशंकर, गोविंद काजळे, शिवाजी पुणे, बालाजी मानवलीकर, अजय राठोड, माणिक कदम, सतीश कदम, खाजा अब्दुल कदीर, संभाजी बादाड यांनी काम पाहिले.
या पोलीस परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धांचे यजमान परभणी होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात गृहपोलीस उपअधिक्षक अनिरुध्द काकडे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे  पोलिस निरिक्षक विवेक पाटील,पोलीस उप निरीक्षक आदित्य लाकुळे,गणेश कोटकर, बालाजी रेड्डी.आणि टीम.
राखीव पोलीस निरीक्षक सोळुंके,राखीव पोलीस उप निरीक्षक शकील नरसिकर, सर्व कवायत प्रशिक्षक,वल्लभ धोत्रे,महेश पांगारकर.  नवनाथ लोखंडे. दीपक साबळे, विश्वनाथ कराळे आणि सर्वच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!