नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद शहरातील सरस्वतीनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. तसेच मनाठा ता.हदगाव येथे महावितरण कंपनीच्या आवारातून विद्युत उपयोगी साहित्य चोरीला गेले आहे. त्याची किंमत 40 हजार रुपये आहे.
सविता देवराव गादेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 वाजेदरम्यान सरस्वतीनगरमधील त्यांच्या घराचे कुलूप काढून कोणी तरी चोरट्यांनी घरात लोखंडी डब्यात ठेवलेले दोन लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 322/2025 प्रमाणे नोंदवली असून पोलीस अंमलदार कुमरे अधिक तपास करीत आहेत.
महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत विश्र्वनाथ भिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरातून 40 हजार रुपये किंमतीचे विद्युत उपयोगी साहित्य चोरीला गेले आहे. मनाठा पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 210/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिरी अधिक तपास करीत आहेत.
धर्माबादमध्ये 2 लाख रोख रक्कमेची चोरी ; मनाठा येथे महावितरण कंपनीचे साहित्य चोरले
