नांदेड–नवनीत प्रकाशनच्यावतीने युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेत होलीसीटीची कु. मीमांसा पाडमुखचा प्रथम क्रमांक आला असून सदरील यशाबद्दल प्रिन्सीपॉल मो अर्शद यांच्यासह सर्व संचालकमंडळ व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
होलीसीटी पब्लिक स्कूल, पासदगाव येथील शाळेत इयत्ता नववीत शिकत असलेल्या मिमांसा पाडमुख हिने अभ्यासासह इतर शालेय स्पर्धेत सतत सहभागी होऊन त्यात प्राविण्य मिळवत आली आहे. ऑलम्पयॉडसह इतर जिल्हा किंवा तत्सम स्पर्धेत नेहमीच बक्षिस प्राप्त केले आहे. शिक्षणातही रँक सांभाळून वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवत आली आहे. नुकतीच नामांकित असलेल्या नवनीत प्रकाशनाने नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्यात कु. मीमांसा पाडमुखने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2050 मध्ये पर्यावरणाच्या परिस्थितीवर भाष्य करणारे चित्र तिने साकारले होते. तिच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण चिद्रावार, सचिव बालाजी उतरवार यांच्यासह प्रिन्सीपॉल मो. अर्शद सर, सौ. सुजता नाईक, पवार सर, सौ. रश्मी यंदे, सौ. अपिर्र्ता कुलकर्णी, यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले आहे.
