नांदेड-महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दत्तक महिना-2025 अंतर्गत दत्तक कायद्याविषयीची जनजागृतीकरण्यासाठी भिंतीपत्रकाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते नुकतेच विमोचन करण्यात आले.
या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील लोकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेची माहिती आणि विशेषत: मुलांना प्रेमळ कुटुंब मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
यावेळी महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ व परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी संदीप फुले, श्रीमती नरसाबाई शिशुगृह आनंदनगर येथील अधिक्षक विरभद्र मठवाले, सामाजिक कार्यकर्ता मारोती दुबेवाड हे उपस्थित होते.
या मोहिमेचा उद्देश दत्तक कायद्याची जनजागृती करणे, समाजात बालकांबाबत संवेदनशिलता व स्विकार्यता वाढवणे आणि प्रत्येक मुलाला प्रेमळ व स्थायी कौटुंबिक वातावरण मिळावे हा आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (सीएआरए) नोव्हेंबर-2025 हा महिना राष्ट्रीय दत्तक जागरुकता महिना म्हणून सुरु केला आहे. प्रत्येक मुल महत्वाचे हा विशेष लोगो आणि हैशटॅग मोहिमेसाठी वापरला जात आहे.

दत्तक प्रक्रीयेसाठी प्रदिर्घ प्रतिक्षा कालावधीमुळे काही पालक बेकायदेशीर किंवा अनधिकृत मार्गाचा अवलंब करतात, जे की धोकादायक ठरु शकते. सीएआरएने स्पष्ट केले आहे की, बाल न्याय अधिनियमानुसार केवळ नोंदणीकृत संस्थांमार्फत कायदेशीर प्रक्रियाच सुरक्षित आणि वैध आहे.