नांदेड (प्रतिनिधी)-तरोडा बुद्रुक येथील स्नेहांकित कॉलनीमध्ये दोन घरांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घरांमधून एकूण ₹4,26,000 किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
तक्रारदार सतीश विठ्ठलराव कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे घर तुळशीराम नगर, स्नेहांकित कॉलनी, तरोडा बुद्रुक येथे आहे.
18 नोव्हेंबर रात्री 11 ते 20 नोव्हेंबर पहाटे 5 या वेळेत अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला.घरातील कपाटातून: ₹3,51,000 किमतीचे सोन्याचे दागिने, ₹50,000 रोकड असा एकूण मोठा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला.या घटनेदरम्यानच शेजारी राहत असलेल्या राजाराम रामचंद्र शिरगिरे यांच्या घरातही चोरी झाली. त्यांच्या घरातून ₹25,000 रोकड चोरून नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.भाग्यनगर पोलिसांनी या दोन्ही घरफोड्यांचा एकच गुन्हा दाखल केला असून गुन्हा क्रमांक 615/2025 असा आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाडेवाले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
