नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठक सेनानी एका 68 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील सोन्याच्या तीन अंगठ्या 72 हजार रुपये किंमतीच्या घेवून गेल्या आहेत. मुक्रामाबाद पोलीसांनी फसवणूक या सदरात दाखल केला आहे.
रामराव धोंडीबा इमाने हे 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास ताईबाई तांडा ते कुंदराळा रस्त्यावर ता.मुखेड येथे पायी जात असतांना चार जण दुचाकीवर आले आणि आम्ही पोलीस असल्याचे सांगून त्यांनी आपले स्वत:चे खोटे ओळखपत्र दाखवले. अंगठ्यांची फसवणूक होत आहे असे सांगून रामराव ईनामे यांच्या हाताच्या बोटातील सोन्याच्या तिन अंगठ्या काढायला लावून एका पुढीमध्ये दोन दगडी खडे ठेवून त्यांना बांधून त्यांच्या खिशात ठेवले. पुढे जाऊन पाहिले असता त्यात दगड होते. रामराव इनामे यांच्या तक्रारीवरुन मुक्रामाबाद पोलीसांनी फसवणूक या सदरात हा गुन्हा क्रमांक 206/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
रायचंद पोलीसांनी वयस्कर व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या गायब केल्या
