मतपेटीतून बाहेर पडला ‘कॉपी-पेस्ट’ निकाल — निवडणुकीला कोड लिहून ठेवलंय का?
बिहार निवडणुकीचा निकाल समोर आला आहे आणि या निकालातील अनेक ‘अप्रत्याशित’ बाबींमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा तेच जुने मुख्यमंत्री दहाव्यांदा शपथ घेण्याच्या तयारीत असताना, वन इंडियाने प्रकाशित केलेल्या एका बातमीने राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे. या बातमीत बिहार निवडणुकीतील निकालांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.काँग्रेसने आरोप केला आहे की दोन उपमुख्यमंत्री आणि तब्बल १३ आमदारांना जवळजवळ एकसारख्या आकड्यांची मते मिळाली, आणि ही संपूर्ण बाब संशयास्पद आहे. या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघाचा डेटा पुन्हा एकदा चर्चेत आला असून काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. स्वतः निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त लोकांनी मतदान केल्याचा मुद्दा देखील वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
१३ आमदारांना जवळजवळ एकसारखी मतसंख्या मिळणे हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. काही ठिकाणी तर मतदान केंद्रावर भाजपाचा एजंटच नव्हता; तरीही त्या ठिकाणी भाजपाचाच उमेदवार जिंकला. निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षाच्या अनेक उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये आश्चर्यकारक समानता दिसत असल्याने विरोधकांकडून संशय आणखी तीव्र झाला आहे.

काँग्रेसने उघड केलेल्या मतसंख्येनुसार:
- उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी : 1,22,480 मते
- उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा : 1,22,408 मते
- मंत्री नीरज कुमार सिंह : 1,22,491 मते
- वीरेंद्र कुमार : 1,22,773 मते
- माजी मंत्री कृष्णकुमार ऋषी : 1,22,494 मते
एक लाख बावीस हजार या आकड्याची पुनरावृत्ती संशय निर्माण करणारी आहे. हे फक्त योगायोग आहे की पूर्वनियोजित “पॅटर्न”? हा प्रश्न 14 नोव्हेंबरपासूनच हल्ली जोरदार चर्चेत आहे. काँग्रेसने मतमोजणीची पुनर्मोजणी करण्याची अधिकृत मागणीही केली आहे.

याखेरीज, आणखी काही आमदारांचे आकडे देखील तितकेच विचित्र आहेत:
- तार किशोर प्रसाद : 1,00055
- सुरेंद्र मेहता : 1,00343
- संजय कुमार पांडे : 1,00044
- रंजन कुमार : 1,00477
- संजय कुमार : 1,00485
- जीवेस कुमार : 1,00496
- रोहित पांडे : 1,00770
- रुहेल रंजन : 1,00487
इतक्या जागी “एक लाख” हे आकडे पुनःपुन्हा दिसणं म्हणजे हा निव्वळ योगायोग म्हणावा की निवडणूक व्यवस्थेतील एखादा ‘डिझाईन पॅटर्न’?

प्रशांत किशोर यांचे प्रश्न
जनसुराज प्रमुख प्रशांत किशोर यांनी मधुबनी विधानसभेबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, तिथे एनडीए उमेदवाराला एक लाखांहून अधिक मते कशी मिळाली, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांचे म्हणणे असे की:
- त्या मतदारसंघातील अनेक लोकांना उपेंद्र कुशवाहाची पार्टी किंवा चिन्ह ओळखीचे नाही.
- तरीही उमेदवाराला प्रचंड मते मिळाली, म्हणजे मतदान प्रक्रियेत काहीतरी गंभीर बिघाड आहे.
दुलारचंद यादव हत्याकांड आणि मतदानातील विसंगती
जनसुराज उमेदवाराचे प्रचारक दुलारचंद यादव यांच्या हत्येनंतर त्यांच्या गावात लोक आक्रोशित होते. तरीदेखील आरोपी अनंत सिंह (JDU) यांना:
- 224 क्रमांकाच्या बूथवर 264 मते
- त्यांच्या विरोधात आरजेडी उमेदवार : 174 मते
- जनसुराजचे उमेदवार (ज्यांच्या प्रचारकाची हत्या झाली): केवळ 15 मते
हे आणखी मोठे प्रश्न उपस्थित करते.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न
माजी आयुक्त राजीव कुमार म्हणत होते की “लोक काहीतरी बोलतच राहतील”.आता नवीन आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणतात:
“शंका आहे तर न्यायालयात जा.”परंतु विरोधकांचा सवाल असा आहे की:
जेव्हा आयोगाचे कायदेच सत्ता पक्षाच्या फायद्याचे असतील, तेव्हा न्यायालयात जाऊन काय होणार?
पत्रकारांनी पुरावे द्यावेत, विरोधकांनी मुद्दे उपस्थित करावेत हे खरे.
पण सत्यता पडताळणे, चुकीवर कारवाई करणे, निवडणुकीची पारदर्शिता सुनिश्चित करणे हे निवडणूक आयोगाचंच काम आहे.
