नशामुक्त भारत अभियानानिमित्त नशामुक्तीची शपथ

नांदेड –  नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच कार्यालयाच्या अधिनस्त शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करुन नशामुक्तीची शपथ घेतली.

नशामुक्त भारत अभियानाला ऑगस्ट २०२५ मध्ये ५ वर्ष पूर्ण झाली असून पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना नशामुक्तीची शपथ घेऊन कर्मचाऱ्यांनी सदर वेबसाईटवर त्यांची नोंदणी करून सदरील प्रमाणपत्र डाऊनलोड केली आहेत. या कार्यक्रमात हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर (१२१), गोविंदराव पऊळ नर्सिंग स्कूल हदगाव (३४), दगडोजीराव पाटील नर्सिंग स्कूल हदगाव (४५), वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर कंधार (१७८), उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालय नांदेड (२१), ग्रामीण टेक्नीकल इन्स्टिट्यूट नांदेड (१८२), सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पांगरी (४२) तसेच जनाई नर्सिंग स्कूल किनवट (२०) या सर्व महाविद्यालयातील एकूण ६४३ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन नशामुक्तीची शपथ घेतली.  सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी नशामुक्तीची शपथ घेऊन प्रमाणपत्र नोंदणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!