नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 17 नोव्हेंबर रोजी रात्री नांदेड-हैद्राबाद रस्त्यावरील चंदासिंग कॉनर्र्र येथे सुर्यास्तानंतर लपवून होणारी वाळू वाहतूक करणार्या एका कंटेनरला पकडले. पण त्यामध्ये वाळू ऐवजी वाळू वाहण्यासाठी वापरण्यात येतात त्या बोटी होत्या. त्या बोटीबद्दल विचारणा केली असता चालकाने सांगितले की, या बोटी वाळू चोरी करण्यासाठी राहाटी गोदावरी नदीच्या घाटावर जाऊन मी सोडणार आहे. पोलीसांनी एम.एच.53 बी 0302 या क्रमांकाचा कंटेनर 60 लाख रुपयांचा एक लोखंडी बोट 20 लाख रुपयांची आणि एक छोटी बोट 5 लाख रुपयांची असा एकूण 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शेख इब्राहिम शेख इस्माईल या पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीवरुन गाडीचा चालक आणि मालक विशाल बाळासो सोनमाळे (25) रा.नाथेपुथे ता.माळशिरसर जि.सोलापूर या विरुध्द गुन्हा क्रमांक 1101/2025 दाखल केला आहे. पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, भोसले, माने, मारवाडे यांनी ही कार्यवाही केली आहे.
संबंधीत व्हिडीओ…
अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी बोटी घेवून जाणारा कंटेनर नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला
