नांदेड(प्रतिनिधी)-शनिवारी न्यायालयात एक दुर्देवी प्रसंग घडला. त्यात एका वकील साहेबांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना वाईट शब्दात वागणूक दिली. या संदर्भाने त्याच दिवशी वकील संघाचे अध्यक्ष आशिष गोदमगावकर यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण संपविले. रविवारी दुसऱ्या पिढीतील वकील असणाऱ्या परंतू वकीली न चालणाऱ्या, बीएचएमबी गटाचा वारसा हक्क मिळालेल्या वकीलाने अनेक वकीलांना फोन करून या घटनेसाठी न्यायालयातील कामकाज सोमवारी बंद ठेवून निषेध व्यक्त करण्याची आपली भावना उघड केली. पण या भावनेमागे काय उद्देश आहे हे आज सोमवारी सिध्द झाले. कारण त्याच्या भावनेला कोणी प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याने घडलेला प्रकार प्रसार माध्यमांकडे लिक केला आणि त्याची बातमी छापून आली. पण बहुदा या वकीलाला हे माहित नाही की, घडलेल्या दुर्देवी प्रकरातील वकीलाने न्यायालयाची माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयात सुध्दा न्यायालयाचा अवमान(कंटेम्पट ऑफ कोर्ट) असे घडले असेल तर मी घडलेल्या प्रकाराची माफी मागतो असे म्हटल्यानंतर तो प्रकार संपविला जात असतो. म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार करणाऱ्या या वकीलाची आज सकाळपासूनच न्यायालय परिसरात चर्चा होत होती.
नांदेड जिल्हा न्यायालयामध्ये आपण दिलेल्या अर्जावर न्यायालयाने आदेश करावा या कारणावरून एका वकील साहेबांची न्यायालयीन कर्मचाऱ्यांसोबत वादावाद झाली. या वादावादीमध्ये काही चुकीचे शब्द त्या वकील साहेबांच्या तोंडातून निघाले. घडलेल्या प्रकार हा न्यायालयासमक्ष घडलेला होता. म्हणून घटना गंभीरच होती.. या संदर्भाने बऱ्याच वकीलांनी चुकीचा प्रकार घडविणाऱ्या वकीलांनाही चांगलेच सुनावले आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे जाऊन वकील साहेबांना माफी मागायला लावली. त्यामुळे हे प्रकरण संपले होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी सुध्दा त्या वकील साहेबांना समज दिली आणि ती त्यांनी समजून घेतली. अर्थात प्रकरणाला पुर्ण विराम झाला होता.
हा प्रकार शनिवारी सायंकाळी न्यायालय बंद होण्याच्या काही वेळ अगोदर घडला. पण या संदर्भाने रविवारी ढापण्या वकीलाने या घटनेची चर्चा संघटनेचे अध्यक्ष आणि इतर वकीलांसोबत सुध्दा केली आणि आपली भावना दाखवली की, न्यायालयाचा अवमान झालेला आहे. म्हणून त्या वकील साहेबांच्या निषेधार्थ सोमवारी न्यायालयीन कामकाज बंद ठेवून निषेध व्यक्त करावा. परंतू सामोपचाराचा प्रकार संघटनेच्या अध्यक्षांसमोर झाला होता. म्हणून त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तेंव्हा त्या वकीलाने इतर वकीलांना सुध्दा फोन लावून निषेधाचा प्रकार घडावा यासाठी अनेक उंबरठे झिजवले. परंतू तेथेही त्याला काही प्रतिसाद आला नाही.
प्रकरणाचे गांभीर्य वाढावे शनिवारी घडलेला प्रकार सार्वजनिक व्हावा या उद्देशाने त्या वकीलाने प्रसार माध्यमांना ही माहिती पुरवली. त्या बातमीत लिहिलेल्या शब्दांना सिध्द करणे एक तर पत्रकाराची जबाबदारी आहे नाही तर पत्रकारला माहिती देणाऱ्या वकीलाची आहे. मग हे कसे सिध्द होणार शनिवारी प्रकार घडला आणि सोमवारी बातमी छापून आली. ती बातमी रविवारीच का आली नाही. मग त्या वकीलाच्या प्रयत्नाला सर्वांनी खो दिल्यामुळे त्या वकीलाने ही माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचवली.
दुसऱ्या पिढीतील वकील असणारा हा व्यक्ती ज्याची वकीली आज चालत नाही त्याने अनेक लोकांच्या जीवनात विष पेरण्याचे काम केलेले आहे. असाच प्रकार त्याने वकीला सोबत घडविण्याचा प्रयत्न केला. बीएचएमबी या गटाचा वारसा हक्क प्राप्त असणाऱ्या या वकीलाने शनिवारच्या वकील साहेबांनी न्यायायलयाची माफी मागितली हे का प्रसार माध्यमांना सांगितली नाही. या संदर्भाने आज सोमवारी न्यायालय सुरू होताच आतापर्यंत चर्चा सुरू आहे.
शनिवारी न्यायालयात घडलेला प्रकार समाप्त झाला असतांना बीएचएमबी ग्रुपच्या वकीलाने शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न केला
