20 नोव्हेंबरला नितीश कुमार दहाव्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपचा ऐतिहासिक विजय असूनही. हे तथ्यच भारतीय राजकारणाच्या संपूर्ण ढोंगी आरसा दाखवतो.या देशात “सर्वात मोठा नेता” म्हटले की लोक तोंडपाठ उत्तर देतात, नरेंद्र मोदी. पण मग प्रश्न उभा राहतो:
इतका “शक्तिशाली” नेता नितीश कुमारांसारख्या एकाच माणसाकडून अकरा वर्षे गोल फिरवला जातोय, हे कसे?
आर्टिकल 19 चे नवीन कुमार थेट म्हणतात: “हे उत्तर मोदींनीच द्यावे. कारण त्यांच्या राजकीय सामर्थ्याला नितीश कुमारांनी वर्षानुवर्षे दोरीला बांधलेल्या बैलासारखे फिरवले आहे.”सभेत रुमाल फिरवून, कट्टा–पट्टा बोलून जनतेला घाबरवणारे मोदी, नितीश सामने आले की मात्र गप्प.हे दृश्य देशभर पसरलेल्या BJP प्रचारयंत्रणेत कुणी दाखवणार नाही.
या निवडणुकीचा मूळ प्लॅन स्पष्ट होता :
नितीश कुमार यांचे राजकीय अस्तित्व संपवणे.
महाराष्ट्रात शिवसेना–राष्ट्रवादी फोडून सत्ता हिसकावली, तसाच डाव बिहारमध्ये खेळण्यात आला.भाजपचा मुख्यमंत्री बनवू असे विचार “जनादेश” ची पतंग भाजपने जोरात उडवली; पण बिहारचा वारा उलट सुटला आणि पतंग कोसळली.20 नोव्हेंबरला नितीश पुन्हा मुख्यमंत्री.भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही.
हे भाजपचे राजकीय अपयशाची जाहीर कबुलीपत्र आहे.
नितीश कुमारांकडे कोणती राजकीय ‘जादू’ आहे?
याचे उत्तर सोपे आहे. तो माणूस मोदी–शहांच्या संपूर्ण गेमप्लॅनला उलटवून टाकण्याची ताकद ठेवतो.राजकारणात ज्या दर्जाचा मेंदू लागतो, तो नितीश कुमारांकडे आहे. हा माणूस राजकारण शिकवत नाही, राजकारण फिरवतो.मोदी स्वतः म्हणालेले: “बिहारच्या लोकांना राजकारण शिकवायची गरज नाही.”तेच आज भाजपला उलट सापडले आहे.

भाग – २
निवडणुकीनंतर संपूर्ण विरोधक भाजपला खुलेआम फाडून काढत आहेत.
प्रत्येक मताचा हिशेब मागत आहेत.
निवडणूक आयोगावर बोट ठेवत आहेत. मात्र, नितीश कुमारांवर मात्र कोणीच प्रश्नच नाही.हेच BJP ला सर्वाधिक जाळत आहे.जेडीयूची जिंकण्याची टक्केवारी 80% — भाजपची 90%.फरक फक्त चार जागांचा.मात्र दोष, राग, आरोप — सगळं भाजपावरच.
नितीश कुमार निर्विकार.
आजही “विकास पुरुष” म्हणत जनतेचा त्यांच्यावर विश्वास कायम आहे.
इतकी प्रचंड सत्ता मिळूनही भाजपला त्यांच्या पुढे गुडघे टेकावे लागत आहेत, हे भाजपच्या राजकारणाचे पराभवाचे प्रमाणपत्र आहे.
भाजप आणि जेडीयूचे कार्यकर्ते—
काही मुख्यमंत्रीपदासाठी गुडघे घासत बसलेले,
काही पायपुसणे करण्याच्या तयारीत —
पण प्रश्न खरा असा:

भाजप नितीशना मुख्यमंत्री बनवतेय कारण
(१) एनडीएचा धर्म पाळतेय?
(२) त्यांच्या कामावर जनादेश आहे म्हणून?
(३) की भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एकही सक्षम माणूस नाही म्हणून?
हा विचारही करणे म्हणजे राजकीय भोळेपणा.जर भाजप खरोखरच सहयोगींचा मान राखत असते तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असते.पूर्ण निवडणूक त्यांच्या नावावर लढली,आणि निकाल लागल्यावर दुधातून माशी काढतो तसे त्यांना बाजूला फेकले.पण नितीश कुमार?तो माणूस शिंदे नाही.त्यांना बाजूला फेकण्याची ‘हिम्मत’ मोदी–शहांमध्ये नाही.त्यांनी नितीशला बाजूला करण्याचा योजना आखली होती. हे चटकन लक्षात येते.पण बिहारचे आकडे, जमीन, जनमत, परिस्थिती काहीच BJP च्या बाजूने नव्हते.

भाग – ३
बिहारमध्ये मतदान चोरीचा मुद्दा फुल गतित आहे.
निवडणूक आयोगाची विश्वसनीयता जमिनीवर घासली गेली आहे.
आयुक्त ज्ञानेश कुमार यांची प्रतिमा चिखलात आहे.राज्यभर लोक चळवळ उभी राहत आहे.आरजेडीचे नवनिर्वाचित आमदारही राजीनाम्याची तयारी करत लोकशाहीवरील लुटीविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.बिहार वरवर शांत दिसत असला तरी मोठ्या राजकीय स्फोटाच्या तोंडावर उभा आहे.जर आंदोलन पेटले तर भाजप राजकीय राख होईल आणि म्हणूनच नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देणे भाजपची मजबुरी आहे.भाजप नितीशला मुख्यमंत्री करत नाही,भाजप स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री करून घेत आहे.हे सत्य आहे.भाजप आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या काळ्या कृत्यांना, निवडणूक चोरीच्या गलिच्छ योजनेला आडोसा देण्याचा प्रयत्न करत आहे.नितीश कुमार म्हणजे त्यांच्यासाठी “राजकीय ढाल”.
मोदींच्या काळात सहयोगी पक्ष टिकलेच नाहीत —
- शिवसेना तुकडे केली
- राष्ट्रवादी फोडले
- अकाली दल बुडवला
- बीएसपी संपवली
पण नितीश कुमार?
या माणसाला हात लावण्याची ताकद त्यांच्यात नाही.
BJP चे स्वतःचे दिग्गज नेतेही मोदींसमोर थरथरतात. नवीन कुमारांनी दिलेल्या उदाहरणांवरून ते दिसते.राजनाथ सिंहांना मोदी-शहांच्या गळ्यात हार टाकण्याचीही हिंमत होत नाही.जे. पी. नड्डा फक्त पदावर आहेत, शक्ती नाही.मोदींनी नितीश कुमारांना एका कार्यक्रमात जबरदस्तीने पुष्पगुच्छ ओढायला लावण्याचा प्रयत्न केला,आणि नितीशने तेवढ्या शांतपणे दाखवून दिले की मोदींचे राजकारण त्यांच्या राजकारणासमोर कमी पडते.निवडणुकीनंतर भाजपचे प्रभारी म्हणतात,“मुख्यमंत्र्यांची निवड विधिमंडळ करेल.”दुसऱ्याच दिवशी BJP अध्यक्ष म्हणतात,“मुख्यमंत्री नितीशच!”म्हणजे BJP च्या घरातच गोंधळ उडाला.त्यामध्ये स्थैर्य आहे ते फक्त एक —
नितीश कुमार हा बिहारचा सर्वात मोठा नेता आहे आणि त्यांना हटवणे BJP च्या आवाक्याबाहेर आहे.
राजकीय इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणाले होते,“काँग्रेसला नितीशसारखा नेता मिळाला असता तर ते सत्ता गमावली नसती; आणि नितीश देशाचे पंतप्रधान झाले असते.”2024 ला ही संधी होती. पण दोन्हीकडे राजकीय दूरदृष्टी कमी पडली.
शेवटी कितीही डावपेच रचले तरी BJP ला नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री बनवण्याची नामुष्की स्वीकारावीली आणि हीच नितीश कुमार यांच्या राजकारणाची खरी ताकद आहे.
