भोकर :- कुष्ठरोग शोध अभियान मोहीम दि.१७ नोव्हेंबर ते दि. २ डिसेंबर या दरम्यान राबविण्यात येत आहे. आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, डॉ. संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, कुष्ठरोग तालुका पर्यवेक्षक संघसेन गजभारे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, प्रल्हाद होळगे, क्षयरोग कर्मचारी विजय क्षीरसागर, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे व आदी कर्मचारी उपस्थित होते..
