नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील एका व्यवसायीकाला सिफ्टा कंपनीच्या मशनरीचे पाच टन लोखंड मिळवून देतो म्हणून दोन जणांकडून 65 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
तरोडा (बु) येथील व्यवसायीक मोहम्मद ताहेर अली सरदार अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 ऑगस्ट 2025 रोजी एमआयडीसी बळीरामपुर येथील सिफ्टा कंपनी दाखवून त्या कंपनीत बंद असलेली मशनरी भंगार भावात मिळवून देतो म्हणून राजविर गजराजसिंह मल्होत्रा रा.मंगलदिप हाऊस काळेवाडी पुणे यांनी हे भंगार 5 टन आहे आणि त्यासाठी फिर्यादीकडून आरटीजीएसच्या माध्यमातून 50 लाख रुपये घेतले आणि दुसरे एक व्यक्ती यांच्याकडून 5 लाख रुपये आणि बँक खात्यातून 10 लाख असे एकूण 15 लाख रुपये घेतले. या प्रकरणात दोघांची 65 लाखांची फसवणूक झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 1086/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
सिफ्टा कंपनीचे पाच टन लोखंड भंगार भावात देण्याचे आमिष दाखवून 65 लाखांची फसवणूक
