उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार तर दक्षिण कार्याध्यक्षपदी प्रकाश महिपल्ले, सरचिटणीसपदी यशपाल भोसले तर सचिवपदी संघरत्न पवार यांची निवड
नांदेड – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषद नांदेड जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी ही कार्यकारणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशाने डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडली आहे.
या कार्यकारणीत उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार यांची तर दक्षिण कार्याध्यक्षपदी प्रकाश महिपल्ले यांची निवड केली आहे. जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी यशपाल भोसले यांच्याकडे तर जिल्हा सचिव म्हणून संघरत्न पवार यांची निवड करण्यात आली आहे सहसचिव पदी मोहम्मद दानिश, जिल्हा संघटक म्हणून गौतम कांबळे, जिल्हा समन्वयक तानाजी शेळगावकर, सह समन्वयक म्हणून हैदर अली यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारणीत चार जिल्हा उपाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये ईशान खान, राजरत्न गायकवाड, मिलिंद वाघमारे आणि अर्जुन राठोड यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नूतन कार्यकारणीस मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, कार्याध्यक्ष अनिल कसबे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुराग पोवळे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
