नांदेड–माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून देखील शिक्षण संचालकाने कायम दुर्लक्ष केले आहे. या विरुद्ध आता पुण्याच्या शनिवारवाड्यापासून शिक्षण संचालक कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष सरिता पाळजकर- साकळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
न्यायालयीन आदेशानंतर सुरू करण्यात आलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून बंद केली आहे.
या प्रमुख मागणीसह अन्य बारा मागण्या संदर्भात आयुक्तांना जाब विचारण्यासाठी पुणे येथील शनिवारवाड्यापासून 17 नोव्हेंबर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य उपाध्यक्षा सरिता पाळजकर साकळकर , जिल्हाध्यक्ष गोपाळ पेंडकर, प्रकाश देशमुख, फारूक सर आदींनी केले आहे.
