नांदेड(प्रतिनिधी)-1966 मध्ये नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळेची सुरूवात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाली होती. सध्या ही रसशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी एक निवेदन माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांना दिले आहे.
आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या रुग्णांना दर्जेदार औषधी उपलब्ध व्हावी म्हणून नांदेडचे जनक कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नानंतर 1966 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात आयुर्वेदिक व युनानी रसशाळा स्थापन करण्यात आली. या रसशाळेला दरवर्षी एक किलो सोने दिले जात होते. आज तर ते अवघडच दिसते आहे. परंतू पुर्वी असे होते. कारण अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सोन्याचा वापर होत असतो. ही रसशाळा न नफा न तोटा या तत्वावर सुरू होती. या औषधी निर्माण करणाऱ्या रसशाळेमुळे आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा प्रात्यशिक म्हणून त्याचा उपयोग होत होता.
मागील काही वर्षापासून या रसशाळेची औषधी निर्मिती थांबविण्यात आली आहे. रसशाळा तोट्यात आहे. या कारणाला पुढे करून शासनाची एकमेव शासकीय रसशाळा बंद होणार आहे. रसशाळा बंद होणार आहे. म्हणजे नांदेडकरांसाठी ही लार्जीवाणी बाब आहे. म्हणून शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा कर्मचारी संघटनेने यात आता पुढाकार घेतला असून संघटनेचे अध्यक्ष पंकज वाठोरे, उपाध्यक्ष मोहम्मद कलीम मोहम्मद सलिम, सचिव तथा कोषाध्यक्ष राजरतन कांबळे, सहसचिव बालाजी सोनकांबळे, बालाजी लुंगारे, महिला प्रतिनिधी सरिताबाई नागठाणे, चंद्रकलाबाई जाधव, करुणाताई यन्नावार, संघटक गणपत गारोळे, संदीप धुताडे, सल्लागार लक्ष्मण नरमवार आणि कार्यकारणी सदस्यांनी एक निवेदन माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांना दिले आहे.
महाराष्ट्रातील एकमेव रसशाळा(औषधी निर्माण कारखाना) बंद होणार ?
