काही वाळू माफीयांविरुध्द कार्यवाही करून शहाजी उमाप यांची उंची गाठणे अशक्य

नांदेड(प्रतिनिधी) -पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हजर नसतांना आम्ही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही हे दाखविण्याच्या फंद्यात नांदेड पोलीस दल मागील काही दिवसांपासून अवैध वाळूंवर कार्यवाही करत आहे. सोबतच त्या कार्यवाहीचे प्रसिध्द पत्रक सुध्दा जारी करत आहे. परंतू ही बाब फक्त काही लोकांना माहित आहे की, एखादी वाळूची मोठी गाडी पकडली तर त्या गाडीकडून 200 मोदकांचा प्रसाद चढविला जात आहे. त्याचा शोध कोण घेणार आणि काही ठिकाणीच कार्यवाही होत आहे आणि काही ठिकाणी नाही. याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर शहाजी उमाप आल्यावर शोधतील.
नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी, पैनगंगा, मांजरा, पुस, आसना या नद्यांसह अनेक छोट्या-छोट्या नद्या सुध्दा वाहतात. ज्यामध्ये वाळू सापडते. वाळूचे पट्टे लिलावाने विक्री करण्याची जबाबदारी महसुल खात्याची आहे. वाळू ठेकेदार मात्र दहा फुट रुंद आणि दहा फुट लांब अशा चौरस पट्यातून तीन फुट वाळू उकरून न्यायची असतांना तो खड्डा दहा फुटापर्यंत होतो. त्याकडे महसुल विभाग सुध्दा मोदकांचा प्रसाद वाटपानंतर गप्प राहतो.
पोलीस सविभाग सहसा असे सांगते की, वाळू या विषयाशी आमचा काही संबंध नहाी. परंतू महसुल आणि गौण खनिज कायद्यानुसार वाळूची वाहतूक ही सुर्यास्त ते सुर्योदय या काळात बंद असते आणि याचाच कायदा फक्त पोलीसांकडेच आहे. कारण रात्री तेच गस्त करतात.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी उमाप आल्यानंतर वाळू माफीया वाळूचे अवैध उत्खनन करून अवैध वाहतुक करतात यावर कार्यवाही केली. कारण शासनाचा महसुल त्यामुळे बुडतो आणि रात्रीच्या वाहतुक कायद्याची पामल्ली होत आहे. हादृष्टीकोण होता. पण काही जणांना आलेल्या सोनीचे संधी करणे या युक्तीप्रमाणे कार्यवाही करायला सुरूवात केली. शहाजी उमाप यांच्या कार्यकाळात च अब्जावधी रुपयांचे वाळू उत्खन्नाचे साहित्य जप्त करण्यात आले. हजारो खटले दाखल करण्यात आले. हजारो वाहनांना आरटीओ आणि महसुल विभागाने लाखोंचा दंड लावला. त्यामुळे वाळू माफीयांचे डोळे पांढरे होवू लागले.
मागील एक महिन्यापासून शहाजी उमाप हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल अकादमी मध्ये आहेत. त्यांचे प्रशिक्षण या महिन्याच्या शेवटी पुर्ण होणार आहे. मागील काही दिवसांपासून जनतेने पाहिले असेल की, नांदेड ग्रामीण, उस्माानगर, सोनखेड या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीसांनी वाळू माफियाविरुध्द पोलीसांनी बऱ्याच कार्यवाहया केल्या. परंतू नांदेड जिल्ह्यात मुदखेड, नायगाव, हदगाव, उमरी, धर्माबाद आदी भाागातून गोदावरी नदी वा हते. बिलोली येये आसना आणि मांजरा नदीचा संगम होतो. मग नांदेड शहराच्या आसपासच वाळू माफीयांच्या विरुध्द सुरू असणारी कार्यवाही जिल्ह्यात इतर ठिकाणी का नाही. बिलोली येथील लाल वाळू देगलूर, मरखेल मार्गे वाहतुक होत असते. त्या ठिकाणी एखादी गाडी पकडल्याची कार्यवाही दिसते. हदगाव येथे चसुध्दा नगण्य कार्यवाही आहे. तसेच लिंबगाव येथे सुध्दा इतर मानाने कमी कारवाई आहे. या मागील गमक काय?
शहाजी उमाप होण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. काही रेतींच्या गाड्यांवर कार्यवाही केली, काही इंजिन पकडले, काही तराफे जाळले, काही बोटी नष्ट केल्या म्हणजे शहाजी उमाप यांची उंची गाठता येत नसते. पोलीस विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याने शहाजी उमाप यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न जरुर करावा. परंतू त्यांची उंची गाठण्याचे स्वप्न मात्र बाळगू नये. राज्य सेवेद्वारे पोलीस विभागात आलेले शहाजी उमाप यांची ख्याती एवढी आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक आयपीएस त्यांना ओळखतो. असेही घटत आहे की, एखादी वाळूची मोठी गाडी पकडली आणि त्याला कार्यवाही केली तर 3 लाख 50 हजार रुपये कायदेशीर दंड लागतो. एक आठवडा किंवा 15 दिवस गाडी बंद राहते आणि मग सुटते. म्हणून वाळू माफीयांनी गाडी पकडल्यानंतर 200 मोदकांचा प्रसाद ही नवीन पध्दत सुरु केली आहे. राज्यात अतिरिक्त पाऊस आणि पुराने थैमान घातले असतांना मात्र वाळू माफीयांसाठी ही परिस्थिती पोषक आहे. कारण जास्त पुरामुळेच जास्त वाळू मिळत असते.
आज ही वाळूची वाहतुक रात्रीसाठी बंद असली तरी आजही बिना नंबरच्या छोट्या, मोठ्या गाड्या दिवस रात्र वाळूची वाहतुक करतांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावस्तीनगर भागातून जातात. यांच्यावर मात्र कधी कोणी कार्यवाही केलेली दिसली नाही. मग उगीच शहाजी उमाप यांची बरोबरी गाठण्याची कसरत का केली जात आहे हे कळायला मार्ग नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!