नांदेड(प्रतिनिधी)-मौजे शिरसी (बु) ता.कंधार येथील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 61 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच कंधार बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करणाऱ्या 60 वर्षीय महिलेच्या पर्समधील 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र कोणी तरी अज्ञात महिलेने चोरले आहे.
कंधार तालुक्यातील शिरसी (बु) येथील विष्णुकांत सुभाष कैलासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते 12 नोव्हेंबरच्या सकाळी 5 वाजेदरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. कोणी तरी चोरट्यांनी या वेळेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिणे 36 हजार रुपयंाचे आणि रोख रक्कम 25 हजार रुपये असा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 373/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
दि.13 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2.30 वाजेच्यासुमारास अनुसयाबाई भोजू राठोड (60) रा.दुर्गा तांडा ह.मु.मुक्ताईनगर कंधार या नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत असतांना त्यांच्या जवळ असलेल्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र 60 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी अज्ञात महिलेने चोरून नेले आहेत. कंधार पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 372/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार डीकळे अधिक तपास करीत आहेत.
मौजे शिरसी येथे घरफोडले; कंधार बसस्थानकात महिलेचे मंगळसुत्र चोरले
