नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी येथे एका महिला डॉक्टराला डोक्याला गंभीर दु:खापत करून, काही साहित्य बळजबरीने चोरून नेले आणि 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. असा प्रकार घडला आहे.
डॉ.गितांजली प्रकाश श्रीरामे रा.पावडेवाडी नाका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या साई मेन्शन अपार्टमेंटमध्ये राहतात. 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास शिवाजी जाधव रा.दयानगर नांदेड याने 1 कोटी रुपये खंडणी दे असे म्हणून डॉ.गितांजलीला लाथाबुक्यांनी मारहाण करून डोक्यात गंभीर दु:खापत केली. घरातील 1 लाख रुपये, एक फोन, अडीच तोळ्याची सोन्याची चैन असा ऐवज बळजबरीने घेवून गेला आणि जिवे मारण्याची धमकी सुध्दा दिली. भाग्यनगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(3), 118(2), 119(1), 115(2), 352, 351 (3) नुसार गुन्हा क्रमांक 608/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जहागिरदार हे करीत आहेत.
डॉ.गितांजली क्षीरामेला मारहाण करून शिवाजी जाधवने मागितली 1 कोटीची खंडणी
