उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र

 नांदेड- जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला व मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME ) हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. राज्यामध्ये त्यांचे महत्व विशेष आहे. नांदेड जिल्हयात सध्या १ लाख १२९ सुक्ष्म, ७२० लघु व ४१ मध्यम असे नोंदणीकृत उद्योग आहेत.

महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्स पर्यंत पोहंचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. शासनाच्या या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापनेकरिता उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजूरी, ना-हरकती, सवलती व तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागातंर्गत मैत्री (MAITRI – Maharashtra, Trade and Investment Facilitation Cell) कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे पुढील सुविधा विविध 14 विभागांच्या 124 सेवा मैत्री 2.0 पोर्टलवर एकात्मिक करुन उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

  • एक खिडकी अर्ज प्रणालीhttps://maitri.maharashtra.gov.in
  • तक्रार/समस्या निवारण
  • हेल्पलाइन मदत कक्ष क्रमांक18002332033
  • गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक
  • प्रोत्साहन गणना

नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी या सेवांचा लाभ घ्यावा जेणेकरून जिल्ह्यात उद्योगांची वाढ होईल व जिल्हयाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. जिल्हयातील उद्योग व गुंतवणूकदारांनी मैत्री या सहाय्य प्रणालीचा लाभ घेवून पोर्टलवर सक्रीय सहभाग नोंदवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!