नांदेड – कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिकांचे विविधीकरण करणे, मूल्यसाखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी “कृषि समृद्धी योजना” सन 2025-26 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.यामध्ये चिया पीक प्रात्यक्षिक आणि मका पीक प्रात्यक्षिकासाठी जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम लाभ देण्यात येणार आहे. इतर घटकांसाठी लॉटरी पध्दतीने अर्जाची सोडत होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पुर्वी अर्ज सादर करावेत. अधिक माहीतीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी, असे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
