किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 

नांदेड – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये किमान आधारभूत दराने सोयाबीन, मूग व उडिद खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी वरील नोंद, 7/12, आधारकार्ड, आधारलिंक बँक खाते इत्यादी आवश्यक कागदपत्रानुसार आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी अथवा NAFED  ई-समृध्दी या मोबाईल ॲपद्वारे स्वंनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहूराज हिरे यांनी केले आहे. या खरेदी केंद्रावर फक्त एफएक्यु दर्जाचा शेतमालाची खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल स्वच्छ व चाळणी करून खरेदी केंद्रावर आणण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात 18.50 लाख मे.टन सोयाबीन, 33 हजार मे. टन मूग व 3.25 लाख मे. टन उडीद खरेदीस मंजूरी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी होणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई. (DMO) (केंद्र–14), विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर. (VCMF) (केंद्र–1) व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे (MSAMB) (केंद्र–18) असे एकूण 33 खरेदी केंद्राला मान्यता मिळालेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील खरेदी केंद्र

खरेदी करणाऱ्या सब सेंटरचे नाव व खरेदी केंद्राचे ठिकाण याप्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई. (DMO) अंतर्गत

  • नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संस्था-खरेदी केंद्राचे ठिकाण अर्धापूर.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. मुखेड-खरेदी केंद्राचे ठिकाण मुखेड.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. हदगाव-खरेदी केंद्राचे ठिकाण हदगाव.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. बिलोली-खरेदी केंद्राचे ठिकाण कासराळी.
  • पंडित दिनदयाळ अभिनव सहकारी संस्था म. देगलूर-खरेदी केंद्राचे ठिकाण देगलूर.
  • तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. लोहा-खरेदी केंद्राचे ठिकाण लोहा.
  •  किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सहकारी संस्था म. किनवट-खरेदी केंद्राचे ठिकाण गणेशपुर.
  • अष्टविनायक सहकारी संस्था म. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाणमानवाडी फाटा.
  • कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था-खरेदी केंद्राचे ठिकाण कुंडलवाडी.
  • बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रीया सहकारी संस्थामुखेड- खरेदी केंद्राचे ठिकाण बेरली खुर्द.
  • मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था-खरेदी केंद्राचे ठिकाण उमरदरी.
  • जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्थानांदेड- खरेदी केंद्राचे ठिकाण कौठा.
  • स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्यादित- खरेदी केंद्राचे ठिकाणशेळगाव थडी.
  • महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बाबशेटवाडीमुखेड- खरेदी केंद्राचे ठिकाणमुक्रामाबाद याप्रमाणे आहेत.

विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर (VCMF) 

तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. धर्माबाद- खरेदी केंद्राचे ठिकाण धर्माबाद.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ (MSAMB)

  • कृषि उत्पन्न बाजार‍ समितीउमरी- खरेदी केंद्राचे ठिकाण उमरी.
  • कृषि उत्पन्न बाजार‍ समिती भोकर- खरेदी केंद्राचे ठिकाणभोकर.
  • कृषि उत्पन्न बाजार‍ समितीकिनवट- खरेदी केंद्राचे ठिकाण किनवट.
  •  कृषि उत्पन्न बाजार‍ समितीनायगाव- खरेदी केंद्राचे ठिकाण नायगाव.
  • कारभारी सर्वोदया फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. शहापूरता.देगलूर- खरेदी केंद्राचे ठिकाणशहापूर.
  • छत्रपती संभाजी महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. जुन्नीता.धर्माबाद- खरेदी केंद्राचे ठिकाण जुन्नी.
  • कयादुजल फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. धानोराता. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाणधानोरा.
  • आर्दश फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. निवघा बाजारता. हदगाव- खरेदी केंद्राचे ठिकाणनिवघा बाजार.
  • राजे मल्हाराव होळकर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नारनाळीता. कंधार- खरेदी केंद्राचे ठिकाणनारनाळी.
  • बसवा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. लहानता. अर्धापूर- खरेदी केंद्राचे ठिकाणलहान.
  • अमूतालयम फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. बेळकोणीता. बिलोली- खरेदी केंद्राचे ठिकाणबेळकोणी.
  • क्वांटिस्ट गोग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. कासराळीता.बिलोली- खरेदी केंद्राचे ठिकाणकासराळी.
  • संतोष पाटील फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. कुंभरगावता.बिलोली- खरेदी केंद्राचे ठिकाणकुंभरगाव.
  • केतकी संगमेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. खानापूरता.देगलूर- खरेदी केंद्राचे ठिकाण खानापूर.
  • धर्माबाद फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. धानोरा खु. ता. धर्माबाद- खरेदी केंद्राचे ठिकाणधानोरा खु.
  • सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. सारखनीता. किनवट- खरेदी केंद्राचे ठिकाणसारखनी.
  • सरोज ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. गोविंद तांडाता. लोहा- खरेदी केंद्राचे ठिकाण गोविंदतांडा.
  • जयश्री प्रभाकर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. मोकसदराता.नायगाव- खरेदी केंद्राचे ठिकाण मोकसदरा याप्रमाणे आहेत.

तसेच हंगाम 2025-26 मध्ये किमान आधारभूत किंमतीनुसार कापूस खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस निगम, मुंबई ने “कपास किसान” हे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 6 केंद्रावर कापसाची खरेदी होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी संबंधित महसूल आणि कृषी विभाग/कृषी विस्तार प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या 2025-26 च्या कापूस लागवड क्षेत्राच्या तपशीलांसह वैध अद्यावत नोंदी सदर ॲपवर अपलोड कराव्या. स्वयं-नोंदणीनंतर संबंधित बाजार समितीकडून त्यांचे प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुर्ण होईल.

खरेदी केंद्रावर अचानक गर्दी आणि लांब रांगा टाळण्यासाठी, सी.सी.आय. नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी “कपास किसान” मोबाइल ॲपद्वारे स्लॉट बुकिंग करण्याची सुविधा असून त्याच्या माध्यमातून शेतकरी 7 दिवसात स्लॉटच्या उपलब्धतेनुसार विक्रीची त्यांची पसंतीची तारीख निवडू शकतात. स्लॉट बुकिंग केल्यानंतर केवळ नोंदणीकृत शेतकरीच किमान आधारभूत किंमती अंतर्गत भारतीय कपास निगमला कापूस विक्री करण्यास पात्र राहतील. कापूस विक्री प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी स्थानिक निगराणी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

नांदेड जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र

कापूस खरेदी केंद्र, तालुका, बाजार समितीचे कार्यक्षेत्र याप्रमाणे आहेत.

  • कापूस खरेदी केंद्र नांदेड- तालुकानांदेड असून कृषि उत्पन्न बाजार समिती नांदेड बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र धर्माबाद-तालुका धर्माबाद असून कृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र कुंटूर नायगाव- तालुकानायगाव असून कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र तामसा-तालुका हदगाव असून कृषि उत्पन्न बाजार समिती हदगाव, उपबाजार तामसा बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र भोकर-तालुका भोकर असून कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
  • कापूस खरेदी केंद्र किनवट-तालुका किनवट असून कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट बाजार समितीचे कार्यक्षेत्र याप्रमाणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!