नांदेड (प्रतिनिधी)- माता गुर्जरी सेवाभावी संस्था यांच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक अनोखा उपक्रम “आत्मनिर्भर नारी” — आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना त्यांच्या अंगभूत कौशल्यांची ओळख करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, आत्मविश्वासू आणि स्वावलंबी बनविणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांना सिलाई, बुनाई, ब्युटी, क्राफ्ट, कुकिंग, फॅशन, डिझायनिंग तसेच इतर कलांद्वारे आपला हुनर जगासमोर आणण्याची आणि घरबसल्या ऑनलाईन काम करून उत्पन्न मिळविण्याची प्रेरणा दिली जाणार आहे. तसेच, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाद्वारे नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.या उपक्रमाद्वारे समान विचारांच्या महिलांना जोडून एक मजबूत महिला समुदाय तयार करण्याचा प्रयत्न संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५, रोजी सकाळी ११ वाजता, AC हॉल, यात्री निवास, नांदेड येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महिलांना त्यांच्या उत्पादनांचे आणि कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी विशेष स्टॉल्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महिला उद्योजक आणि प्रतिभावान गृहिणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क क्रमांक: • कार्यक्रम माहिती: 7666936177 / 8625806159
• स्टॉल रजिस्ट्रेशन: 9545395888
संयोजन:
अमर सेवा आश्रम ट्रस्ट, गुरुद्वारा गेट नं. ६, नांदेड
अध्यक्ष: हरमिंदर कौर रंजीत सिंह गिल (कोमल कौर कामठेकर)
“महिला शक्ति ही समाज की प्रगति का आधार है।”
