परभणी (प्रतिनिधी)- ७ वे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, मराठी भाषा विभाग मुंबई आणि तरुणाई फाऊंडेशन कुटासा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी अकोल्यातील वसंत सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय येथे वैचारिक मंथनाचा भव्य सोहळा होत आहे. या संमेलनात परभणीचे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साप्ताहिक स.बंड व समाजहित न्यूजचे संपादक, रुग्णहक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष, समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ सचिव, बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच मराठवाडा महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी प्रभारी परभणी तालुकाध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे यांना “राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री २०२५-२६” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकारिता, सामाजिक बदलासाठीची निःस्वार्थ धडपड, शैक्षणिक क्षेत्रातील सक्रियता, रुग्णसेवा तसेच जनआंदोलनामधील निर्भीड भूमिकेचा परखड आढावा घेऊन हा सन्मान जेष्ठ पत्रकार आणि संमेलन स्वागताध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्यासह आयोजन समितीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.
या संमेलनाला सुप्रसिद्ध वऱ्हाडी कथाकार सु. पु. अढाऊकर संमेलनाध्यक्ष असून उद्घाटन माजी पोलीस महासंचालक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रा. डॉ. किरण वाघमारे (आयोजन समिती अध्यक्ष), जेष्ठ पत्रकार अकोला संजय एम. देशमुख (स्वागतध्यक्ष), प्रा. डॉ. गणेश मेनकार (सचिव) आणि तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक संदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद अंभोरे यांना पुरस्कार प्रदान केला जाणार असून त्यांच्या निवडीमुळे परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
