नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांच्यावर जिवघेणा हल्ला झाल्याची खबर आली होती. दुसऱ्या दिवशी मात्र यात भरपुर मोठा राडा झाल्याची माहिती आली. त्यात बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधुंनी मिळून एका अल्पवयीन बालकाला एवढे मारले होते की, त्याच्या शरिरावर जवळपास 40 पेक्षा जास्त जखमा होत्या. त्याप्रकरणात अखेर पोलीस खाते करील ते होईल असेच झाले आणि बालाजी सातपुते यांना नोटीस देण्यात आली आहे.
14 सप्टेंबर रोजी विष्णुपूरी येथे बालाजी सातपुते यांच्या घरासमोर भांडण झाले. ज्यामध्ये ज्यामध्ये बालाजी सातपुते यांना सुध्दा चांगलाच मार लागला आणि विरुध्द दिशेला दोन अल्पवयीन बालकांना जबर मारहाण सातपुते कुटूंबियांनी केली. पण पोलीसावर हल्ला झाला. याबाबीला पोलीस अधिक्षकांनी हा पोलीस म्हणून हल्ला झाला नाही अशी स्पष्टोक्ती दिली. तरी पण बालाजी सातपुते हे पोलीस आहेत म्हणून त्यांना पोलीस दलाचा आधार मिळणारच हेही तेवढेच सत्य आहे.
या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बालाजी सातपुतेचे बंधू यांच्या तक्रारीवरुन जिवघेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांच्याविरुध्द अल्पवयीन बालकाचा दवाखान्यात घेतलेला जबाब यानुसार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूंवर गुन्हा दाखल झाला. पण तो गुन्हा जामीन पात्र होता. वास्तव न्युज लाईव्हने बातमी छापल्यानंतरच त्या जखमी अल्पवयीन बालकाचा जबाब घेण्यात आला होता. याप्रकरणात पोलीस अधिक्षकांनी सातपुते फिर्यादी असलेला गुन्हा पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे वर्ग केला. तसेच अल्पवयीन बालक तक्रारदार असलेला आणि बालाजी सातपुते विरुध्दचा गुन्हा तपासासाठी इतवारा पोलीस निरिक्षकांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. इतवारातील दुय्यम पोलीस निरिक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार सातपुते फिर्यादी असलेल्या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील चार अल्पवयीन बालक आहेत. तसेच त्या प्रकरणात अजून चार जणांना अटक करायची आहे. त्यामध्येही एक अल्पवयीन बालक आहे. पण अल्पवयीन बालकाच्या तक्रारीनुसार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूंना अटक न करता नोटीस देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. म्हणून या प्रकरणात पोलीस खाते करील तेच होईल असेच झाले.
पोलीस अंमलदार बालाजी सातपुते विरुध्दचा गुन्हा जामीन पात्र; नोटीस दिली
