नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांनी रामतिर्थ पोलीसांना सोबत घेवून पोलीस ठाणे नायगाव आणि पोलीस ठाणे कुंटूरच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुक करणारे दोन टिप्पर पकडले. त्यातील वाळू 56 हजारांची आणि गाड्या 33 लाखांच्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांनी पोलीस ठाणे रामतिर्थचे पोलीस उपनिरिक्षक शिवराज नरवाडे आणि इतर पोलीसांना सोबत घेवून 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर माऊली पेट्रोल पंप, नांदेड-नरसी रस्त्यावर टिपर क्रमांक एम.एच.03 सी.पी.6921 थांबवला आणि तपासणी केली त्यात 2.5 ब्रास काळी वाळू भरलेली होती. वाळूची किंमत 20 हजार आणि गाडीची 8 लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर याच पथकाने पोलीस ठाणे कुंटूरच्या हद्दीतील बरबडा ते अंतरगाव जाणाऱ्या रस्त्यावर टिपर क्रमांक एम.एच.14 एच.यु.6455 थांबवला. त्यात काळ्या रंगाची 4.5 ब्रास अवैध वाळू भरलेली होती. वाळूची किंमत 36 हजार आणि गाड्यांची किंमत 25 लाख असा एकूण या दोन प्रकरणांमध्ये पोलीसांनी 33 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नायगाव आणि कुंटूर पोलीस ठाण्यात गोपीराज धोंडीबा हंबर्डे (22) रा.वाका ता.लोहा, मारोती अशोक पुरी (21) रा.बेंबर ता.भोकर, पांडूरंग अवधुत कदम (24) आणि गणपती रघुनाथ कदम (40) रा.शंकतिर्थ ता.मुदखेड या चार जणांविरुध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

