अर्धापूरमध्ये घरफोडी 2 लाख 85 हजारांचा ऐवज लंपास

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी
नांदेड(प्रतिनिधी) -अर्धापूर गावात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 85 हजार 300 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सद्‌गुरू फायनान्सजवळ तीन जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्या खिशातील 8 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत. हिमायतनगर येथे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पकडण्यात आले आहे.
अर्धापूर येथील माधवराव लक्ष्मण गाडे यांचे घर गणपतराव देसाईनगर अर्धापूर येथे आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी 10 ते 8 नोव्हेंबरच्या पहाटे 8 वाजेदरम्यान ते घरात नसतांना त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 85 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 649/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.
शेख इरशाद मुस्तफा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास सद्‌गुरू फायनान्ससमोर दिपु महाराज उर्फ रणदिपसिंघ, बंटी सोळंके आणि निखील सोळंके यांनी शेख इरशादला मारहाण करून तु आमच्याकडे का काम करत नाहीस अशी विचारणा केली आणि त्याच्या खिशातील 8 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 411/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक हुसेन अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!