नांदेड शहरातील संत बाबा निधान सिंघ जी चौक (गुरूद्वारा चौरस्ता) तसेच गुरु गोबिंद सिंघ जी रोड ही नावे शासनमान्य असून अधिकृत नोंदीत आहेत. परंतु अलीकडील काळात वारंवार असे दिसून येत आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय असो वा पोलिस प्रशासन, जेव्हा वाहतूक वळविण्याची पत्रके अथवा सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केल्या जातात, तेव्हा या ठिकाणांचा उल्लेख चुकीने “देना बँक चौक” अशा नावाने करण्यात येतो.
ही बाब अत्यंत खेदजनक असून, त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. शासनाच्या अधिकृत नोंदीनुसार श्री गुरु गोबिंद सिंघ जी रोडवर “देना बँक चौक” नावाचा कोणताही चौक अस्तित्वात नाही. तरीही वारंवार हे नाव वापरले जाणे हे शासनमान्य नावांचा अनादर ठरतो.
*यामुळे नांदेड जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग तसेच संबंधित शासकीय अधिकारी यांना नम्र विनंती आहे की*
1. शासनमान्य नावांनाच सर्व शासकीय परिपत्रक, पत्रक, फलक आणि सूचनांमध्ये स्थान द्यावे.
2. “संत बाबा निधान सिंघ जी चौक”, “गुरूद्वारा चौरस्ता” आणि “गुरु गोबिंद सिंघ जी रोड” या नावांचा योग्य सन्मान राखावा.
3. वजीराबाद पोलिस स्टेशन ते गुरूद्वारा हनुमान मंदिर रोड, संचखड रोड, हिंगोली गेट उड्डाण पूल (श्री गुरु ग्रंथ साहिब जी उड्डाण पूल) तसेच इतर गुरूद्वारांलगत असलेल्या सर्व रस्ते आणि चौकांवर योग्य शासकीय नावांचे फलक लावण्यात यावेत.
ही केवळ नामांतराची बाब नसून, हे नाव त्या संत महापुरुषांच्या कार्याची आणि शहराच्या आध्यात्मिक ओळखीची निशाणी आहे. म्हणून शासनमान्य नावांचा योग्य सन्मान राखणे ही प्रत्येक प्रशासनाची जबाबदारी आहे.
लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, ही नम्र अपेक्षा आहे.
–राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
*📞 7700063999*
