नांदेड(प्रतिनिधी)- सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे वारे वाहत आहे. या संदर्भाने आगामी महानगरपालिका नांदेडच्या निवडणुकीतील विविध आरक्षीत संवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यासाठी आणि त्यावरील हरकती आणि सुचनासाठींचा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी जाहीर केला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागास प्रवर्ग, नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी निवडणुकीतील प्रभागांचे आरक्षण सोडत काढण्यासाठी आणि आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करून हरकती व सुचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
आरक्षण सोडत दिनांक मंगळवार, दि.11 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजता डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड, आरक्षण प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक सोमवार दि.17 नोव्हेंबर 2025, हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी सोमवार दि.17 नोव्हेंबर 2025 ते सोमवार दि.24 नोव्हेंबर 2025 च्या दुपारी 3 वाजेपर्यंत, हरकती आणि सुचना निवडणुक विभाग स्टेडियम परिसर नांदेड येथे सादर करायचा आहेत. यानंतर दाखल झालेल्या हरकती आणि सुचनांवर विचार घेवून आरक्षणाची अंतिम अधिसुचना जारी करण्यात येईल.
महानगरपालिका प्रभाग आरक्षणाच्या सोडती मंगळवारी
