नांदेड(प्रतिनिधी)- रेल्वे स्थानकावरून बाहेर पडत असलेल्या महिलेच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.
शितल अजय कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता त्या तपोवन एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानकावर आल्या. रेल्वेतून उतरून मुख्य गेटकडे जात असताना विशाल गंगाधर विरक्त (रा. वैभव नगर, शहर पेठ, ता. वसमत, जि. हिंगोली) या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन ग्रॅम वजनाचे व २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. जनतेने आणि पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला घटनास्थळीच पकडले. या प्रकरणी वैवजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५२/२०२५ नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे पुढील तपास करीत आहेत.
