पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र आवटे, उपनिरीक्षक दिलीप जाधव तसेच पोलिस अंमलदार सोनाजी कानगुडे, सिद्धार्थ केळकर, संजीव जिंकलवाड, विष्णू खिल्लारे आणि गुरुदास आरेवार यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
पोलिसांनी डॉ.आंबेडकर नगर चौक ते हिमायतनगर जाणाऱ्या मार्गावरील बटाला रोड टी-पॉइंट, भोकर येथे संशयित चारचाकी वाहन (क्र. MH 44 G 2640) थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेले विविध कंपनींचे पानमसाला, गुटखा आणि सुगंधित पानमसाला असे एकूण 194 पाकिटे आढळून आली. त्यांची किंमत रु. 1,62,020 इतकी आहे.या साहित्याची वाहतूक करणारी चारचाकी गाडी रु. 6 लाख किमतीची असून, अशा प्रकारे एकूण रु. 7,62,020 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी सोनाजी कानगुडे यांच्या तक्रारीवरून शेख तनवीर शेख अहमद (वय 27, रा. भोकर नवीन जिल्हा), नईम जिलानी कुरेशी (रा. भोकर) तसेच अमान आणि रिजवान (पूर्ण माहिती अपुरी) या चार संशयितांविरुद्ध भारतीय सुरक्षा मानके कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कलम 524/2025 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील वाहनचालक शेख तनवीर शेख अहमद हा सध्या भोकर पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे.
