नांदेड – वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी वंदे मातरम गीताचे गान होणार आहे. या कार्यक्रमास सर्व विभागातील शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
वंदे मातरम गीताने जनमानसात देशभक्तीपर देशभावना जागृत होण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. त्याअनुंषगाने हा कार्यक्रम संबंधित तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे तालुकानिहाय ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत.
नांदेड येथे श्री गुरूग्रंथ साहिबजी भवन, अर्धापूर येथे मिनाक्षी हायस्कुल, उमरी येथे यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, हदगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड येथे जिल्हा परिषद मुलींची शाळा, मुदखेड येथे तालुका क्रिडा संकुल, नायगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली येथे पोलीस कॉर्टर ग्रांउड, देगलूर येथे मानव्य विकास विद्यालय, कंधार येथे शिवाजी हायस्कुल, माहूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथे छत्रपती शाहू विद्यालय, हिमायतनगर येथे हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, धर्माबाद येथे तालुका क्रीडा संकुल, लोहा येथे कै. विश्वनाथ नळगे विद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास संबंधित तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
