नांदेड(प्रतिनिधी)-नेहमीच वादग्रस्त असणार्या हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांची तिथे बदली होईल तेथे त्या वादग्रस्तच ठरत असतात. सध्या हदगाव येथे तसहीलदार म्हणून त्या कार्यरत होत्या. ग्राम पंचायत सरपंच पदाच्या आरक्षणावरुन असंख्य तक्रारी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहचल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवून दि.4 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश नंादेड जिल्हाधिकारी यांना दिले.
हदगाव तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण काढतांना त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला तसेच सर्वसाधारण ते आरक्षण काढतांना जाणिवपुर्वक चुकीच्या पध्दतीने आरक्षण काढल्याच्या तक्रारी राज्य निवडणुक आयोगाकडे केल्या होत्या. राज्य निवडणुक आयोगाने या तक्रारीच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांना चौकशी करून तो अहवाल सादर करावा असे आदेश 15 सप्टेंबर रोजी दिले होते. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमूण तो अहवाल पाठविला होता. या अहवालाच्या अनुशंगाने महाराष्ट्र राज्याचे सहसचिव मनिष जायभाये यांनी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे श्रीमती सुरेखा नांदे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावे असे पत्र 4 नोव्हेंबर रोजी बजावले आहे.
तहसीलदार सुरेखा नांदे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश
