नांदेड(प्रतिनिधी)-मराठी पत्रकार परिषदेच्या व्हाटसऍप गु्रपवर भाजप कार्यकर्ते तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी टाकलेला खुलासा जाहीर झाला नाही. फक्त त्या एका व्हाटसऍप गु्रपवर टाकून भोकर पत्रकार संघाचे गैरसमज दुर झाले असल्याचे लिहिले आहे. भोकरमधील पत्रकार मात्र या घटनेला पुर्णपणे दुजोरा देत नाहीत. अशाच प्रकारे चालणार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे काम. अशी परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे.इतर पत्रकार संघटनांनी सुध्दा या घटनेचा निषेध केला होता. परंतू नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अद्याप निषेध व्यक्त केला नाही. 25 जानेवारी 2025 रोजी भोकर येथील एका पाणी पुरवठा आढावा बैठकीत खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकारांनी या सभागृहाबाहेर जावे असे तिन ते चार वेळेस ध्वनीक्षेेपकावर सांगितल्यानंतर पत्रकार तेथून निघून गेले आणि त्यांनी या घटनेच्या निषेधाचे निवेदन राष्ट्रपतींना दिले. त्यानंतर काही निवडक पत्रकारांना खा.अशोक चव्हाण यांनी बोलावून दिलगिरी व्यक्त केली असे जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते संतोष पांडागळे सांगतात. त्यांनी मराठी पत्रकार संघटनेच्या व्हॉटसऍप गु्रपवर या संदर्भाची माहिती लिहिली आहे. त्यामध्ये मी संतोष पांडागळे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क करून माहिती जाणून घेतली असे सुंदर वाक्य लिहिले आहे. एका व्हाटसऍप गु्रपवर अशा पध्दतीचा खुलासा सादर केल्याने हे प्रकरण समाप्त होते काय? अर्थात फक्त मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांना दाखविण्याचा हा प्रकार आहे. कारण एस.एम. देशमुख यांनी भोकरच्या पत्रकारांना निषेध व्यक्त करा आणि ती बातमी माझ्याकडे पाठवा असे बोलल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. मराठी पत्रकार परिषदेच्या व्हॉटसऍप गु्रपवर खुलासा आल्यानंतर भोकरच्या काही पत्रकारांशी संपर्क साधला असता. त्यांनी असे काही मिटले नाही असे सांगितले. मग त्यांना न विचारता संतोष पांडागळेंनी त्यांचे नाव आपल्या खुलाशात कसे छापले. या प्रश्नाचे उत्तर सुध्दा अनुत्तरीत आहे. राजा हरीश्चंद्रासारखे संतोष पांडागळे यांनी आपल्या शब्दात सांगितलेला खुलासा मान्य करण्याशिवाय नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांना पर्याय तरी काय आहे.आज भोकर येथे प्रकार घडला. उद्या उर्वरीत 15 तालुक्यांमध्ये घडले. मग अशा वेळे पत्रकारांची संघटना असलेल्या जिल्हा मराठी पत्रकार संघटनेने त्यांच्यासाठी काय भुमिका घेतली हे जनतेला तरी कळायला हवे. नांदेड जिल्ह्यातील कवि शैलेश कवठेकर आपल्या सत्व व सत्य या कवितेत म्हणतात. कवी लेखक असतात, साधारण सामान्य, पण असे काही लिहितात, बनतात काही असामान्य, काही साहित्यीक लिहितात, असे काही अनमोल, की जगाच्या बाजारात, होवू शकत नाही त्याचे मौल, हल्ली खुप जन लिहितात, फुकट आहे प्रत्येकाला धुमारे, पण विरांनो लिहितांना, सत्य व सत्व जरा जपारे.. Kanthak Suryatal Post Views: 2,616 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित ;नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही अनेक प्रसार माध्यमांनी नरेंद्र मोदींच्या बुटाखाली आपली नैतिकता घासली आणि आदीवासी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंचे अवमुल्यन केले