नवीन नांदेड(प्रतिनिधी)-1 नोव्हेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी पिंपळगाव निमजी शिवारात रात्री 10 वाजेच्यासुमारास एक 40 लाखांचा हायवा गाडी आणि त्यात 20 हजार रुपये किंमतीची अवैध वाळू पकडली आहे.
दि.1 नोव्हेंबर रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, विष्णु कल्याणकर, मारोती पचलिंग, शेख जमीर, धम्मपाल कांबळे हे सर्व गस्त करत असतांना पिंपळगाव निमजी शिवारात त्यांनी एम.एच.26 बी.डी.1213 ही 40 लाख रुपये किंमतीची हायवा गाडी थांबवली. त्यामध्ये 20 हजार रुपये किंमतीची अवैध वाळू भरलेली होती.
पोलीस अंमलदार शेख आसीफ शेख अजगर यांच्या तक्रारीवरुन स्वप्नील दिलीप चौदंते रा.मुदखेड आणि सचिन कदम रा.जानापुरी यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 1043/2025 दाखल करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 40 लाखांची गाडी आणि 20 हजारांची अवैध वाळू पकडली
