नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी गावात 2 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 वाजेच्यासुमारस 21 वर्षीय युवक रितेश पावडेवर काही जणांनी हल्ला करून त्याचा खून केला आहे. त्याच्या शरिरावर 12 ते 13 जखमा आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार पावडेवाडी गावात राहणारा युवक रितेश पावडे (21) हा काल रात्री 1 वाजेच्यासुमारास आपल्या घरी पावडेवाडीत गेला. त्याच्यासोबत अजून दोन जण होते. रितेश पावडेचे घर ऑक्सफर्ड शाळेपासून 50 मिटरच्या अंतरातच आहे. त्याच्या मागावर असलेल्या काही जणांनी त्याच्यावर समोरुन आणि मागून अशा दोन्ही बाजूने हल्ला करून तलवारी आणि खंजीरने त्याच्या शरिरावर 12 ते 13 जखमा केल्या. तो जागीच मरण पावला. सांगितले जाते की, काही महिन्यांपुर्वी गावातील आणि भावकीतील दिगंबर उर्फ दिपु पावडे याच्यासोबत रितेश पावडेचे भांडण झाले होते. त्यावेळी रितेश पावडेने दिपु पावडेला मारहाण केली होती. घडलेला प्रकार 3 ते 4 लोकांनी मिळून केला असावा असा अंदाज आहे. रात्रीपासूनच भाग्यनगर पोलीस आरोपीच्या शोधात तांत्रिक मदतीने पाठलाग करत आहे.
पावडेवाडीत रितेश पावडेचा निघृण खून
