नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरात लपलेला साप महत्वाचा की, घराबाहेर असलेले कोल्हे-लांडगे महत्वाचे. त्यात आपल्या घरातील साप सुध्दा आता बाहेर गेला आहे. म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत लढण्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती तयार झाली आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडची युवा नेते सुजात आंबेडकर यंानी केले.
नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भाने आढावा घेण्यासाठी सुजात आंबेडकर हे नांदेडमध्ये आले आहेत. काल रात्री लेबर कॉलनी येथे माजी नगरसेवक सय्यद जानी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुजात आंबेडकर बोलत होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना सुजात आंबेडकर यांनी साप आणि कोल्ह्याची सविस्तर गोष्ट उपस्थितांना सांगितली. त्यात बाहेरचे लांडगे-कोल्हे म्हणजे सुजात आंबेडकर यांच्या मते भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट हे आहेत. घरातील साप म्हणजे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि नांदेडपुर्ते मर्यादीत म्हणजे खा.अशोक चव्हाण असे सुजात आंबेडकर म्हणाले. या आपल्या वाक्याचे स्पष्टीकरण करतांना सुजात आंबेडकरांनी पुढे सांगितले की, डॉ.शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यांना तुम्ही मतदान यासाठी दिले की, ते धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षाकर्डूीन उमेदवार असायचे. तो पक्ष ही साप आणि सध्याच्या परिस्थितीत अशोक चव्हाण सुध्दा साप कारण त्यांनी मतदारांचा विचार न करता किंबहुना मतदारांचा विचार न घेता स्वत: भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सत्ता असावी, पैसा असावा आणि बुलढाणा अर्बन बॅंकेतील घोट्याच्या संदर्भाने आपल्याला तुरूंगात जाण्याची वेळ येवू नये म्हणून खा.अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तेंव्हा आपल्या सर्वांना आता या साप आणि कोल्हा-लांडग्यांपासून वाचायचे आहे किंबहुना त्यांच्यासोबत लढत द्यायची आहे. म्हणून हिम्मत असणाऱ्या, जिगरबाज लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या सोबत यावे.
उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओमकार लांडगेला मारहाण झाली. कारण त्याने सुजात आंबेडकरांच्या औरंगाबाद येथील मोर्चा बद्दलची माहिती आपल्या सामाजिक संकेतस्थळांवर ठेवली होती. ओमकार लांडगे आणि त्याच्या बंधूला समोर बोलावून सुजात आंबेडकर यांनी सांगितले की हा सुध्दा खरा हिम्मतवान आणि जिगरबाज आहे. त्यांनी उपस्थितांना सांगितले की, अशाच पध्दतीने कोणी पोलीस त्रास देत असेल, पोलीस ठाण्यात बोलवत असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. मारहाण झाल्यानंतर त्याच दिवशी ओबीसी मेळाव्यासाठी आलेल्या ऍड. प्रकाश आंबेडकरांना ओमकार लांडगे भेटले आणि नांदेडच्या पोलीस अधिक्षकांना तेथेच यावे लागले होते असे सांगितले.
वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टिम म्हणारे अशोक चव्हाण, अजित पवार हे भारतीय जनता पार्टीत आहेत आणि त्यांच्यासोबत काम करीत आहेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी तर ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. तो तर फक्त 50 खोकेमध्ये ओके झाला असे सांगत सुजात आंबेडकरांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत त्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहिजे असे सांगितले.
खा.अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील मतदारांच्या घरात लपलेला साप-सुजात आंबेडकर
