नांदेड– शहरातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते. प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी यापुर्वी सर्वे करण्यात आला परंतू अनेक लाभार्थी या मदतीपासून वंचित राहिल्यामुळे प्रशासनाने परत सरसगट शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा सर्वे करावा अशी मागणी विलास धबाले, गफार खान, बंटी लांडगे यांनी केली आहे.
शहरातील श्रावस्तीनगर, लालवाडी व प्रभाग क्र्रं. 18 मधील खडकपुरा, देगावचाळ, समीराबाग, दुलेशाह रहेमान नगर, तोहराबाग, पंचशिलनगर, भिमघाट, भैयासाहेब आंबेडकर नगर, नलागुट्टा चाळ, गंगाचाळ, पक्कीचाळ या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची नोंद झाली होती. अतिवृष्टीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून संसार उपयोगी साहित्य नासधूस झाले होते. परंतू प्रशासनाची कोणतीही मदत या नागरिकांना मिळाली नाही. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांचा सरसगट सर्वे करून तात्काळ मदत द्यावी अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. असा ईशारा माजी महापौर प्रतिनिधी विलास धबाले, माजी सभापती गफार खान, युवा नेते बंटी लांडगे यांनी दिला आहे.
