अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा नांदेड दौरा 

नांदेड :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग मुंबईचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरूवार 6 नोव्हेंबर 2025 रोजी सोयीनुसार परभणी येथून बायरोडने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे रवाना व मुक्काम.

शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग मुंबईचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड महानगरपालिका येथील सभागृह हॉलमध्ये आयुक्त नांदेड महानगरपालिका यांच्यासोबत नांदेड महानगरपालिका यांचेकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच अनुसूचित जातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी. लाडपागे, दलितवस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना व अनुकंपाबाबत आढावा बैठक. दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील सभागृहामध्ये जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत संविधान-5 निधीबाबत आढावा बैठक. सोयीनुसार नांदेड येथून बायरोडने पुणेकडे रवाना होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!