नांदेड –युवा पिढीला एकात्म मानव दर्शनाच्या लोक कल्याणकारी विचारांची प्रेरणा मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानावर आधारित एका दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे/परिसंवादाचे आयोजन दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात करण्यात आले आहे. या परिसंवादात पद्मश्री मा. भिकू रामजी इदाते आणि प्रा. डॉ. राम मंठाळकर हे तज्ञ साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असणार आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मनोहर चासकर हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अशोक महाजन व सर्व विद्यापीठ प्राधिकरण सदस्य यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव प्रा. डॉ. डी.डी. पवार, शिक्षणशास्त्र संकुल संचालिका प्रा. डॉ. वैजयंता पाटील आणि समन्वयक प्रा. डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी केले आहे.
