भारतात कोणताही सण-उत्सव असो आणि त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत नाहीत, असे घडतच नाही. मागील काही वर्षांपासून आपण पाहत आहोत की भारतासह जगभरात गाजणारी छठपूजा मोठ्या थाटामाटात साजरी होते. यावर्षी या पूजेसाठी दिल्लीतील यमुनेच्या काठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले होते.दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता देखील या कार्यक्रमासाठी पूर्णपणे तयार होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, “मी मुख्यमंत्री झाल्यापासून काय-काय केले आहे, हे मोदीजींना सांगायचे आहे.” मात्र, अगदी ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या कार्यक्रमासाठी यमुनेचा एक कृत्रिम घाट तयार करण्यात आला होता.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यमुना नदीवरील वासुदेव घाटावर छठपूजा करून त्याचा प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करणार होते, परंतु ते गेले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना विचारले असता त्यांनी याचे खंडन केले नाही. मात्र प्रश्न असा निर्माण झाला की एवढी मोठी तयारी करूनही पंतप्रधान मोदी नकली यमुनेवर पूजा करण्यासाठी का गेले नाहीत?या प्रकारामुळे “गोदी मीडियाचे पितळ” उघडे पडले, असे म्हटले जात आहे. गोदी मीडियाने या विषयावर काहीही बोलणे टाळले, पण पर्यायी माध्यमे आणि काही यूट्यूब चॅनेल्सनी या संदर्भातील बातम्या प्रकाशित करून सत्य जनतेसमोर आणले.

जगात आपली खिल्ली उडू नये म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले जात आहे. यमुनेच्या संदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केलेली “धोकेबाजी” सोशल मीडियावर उघड झाली. त्यामुळे वासुदेव घाटावरील हा कार्यक्रम रद्द करण्यात आला, असे आप पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी ‘X’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.
सध्या बिहारची निवडणूक अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपली असताना हा छठपूजेचा देखावा रद्द करण्यात आला. दुसरीकडे, दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. दिल्लीतील यमुना नदीच्या वास्तविक परिस्थितीबाबत बीबीसी आणि काही यूट्यूब चॅनेल्सनी केलेल्या रिपोर्ट्समध्ये बनावटपणा उघड झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दूरदर्शन आणि काही गोदी मीडियाने वासुदेव घाटावरून रिपोर्ट दाखवत “यमुना स्वच्छ आहे” असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.बीबीसी आणि काही यूट्यूब चॅनेल्सनी सोमवारी त्यांच्या रिपोर्टमध्ये दाखवले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक कृत्रिम यमुना नदी तयार करण्यात आली होती आणि त्यात मिनरल वॉटरसारखे पाणी टाकले गेले. सोनिया विहार येथे पाईपद्वारे पाणी आणण्यात आले होते.

मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी छठपूजेच्या निमित्ताने भारतीय जनतेस शुभेच्छा संदेश जारी केला, परंतु त्यात कोणताही फोटो किंवा व्हिडिओ नव्हता. यापूर्वी दरवर्षी मोदी भोजपुरी गीतांच्या लिंक्स आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत असत. यंदा त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाला, पण शेवटी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.यापूर्वी कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील यमुना नदीवरील कोणत्याही घाटावर गेले नव्हते. मात्र यंदा सोशल मीडियावरील चर्चेमुळे त्यांना तिथे जाणे टाळावे लागले.
आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले —
“भगवान सूर्यदेवाला सकाळच्या प्रहरात अर्घ्य देण्यापासून आज छठपूजेचा शुभारंभ झाला आहे. चार दिवसीय अनुष्ठानादरम्यान छठपूजा आपल्या भव्य परंपरेचे दर्शन घडवते. सर्व व्रतधारकांनी या पावन पर्वात सहभागी व्हावे. सर्वांना आणि त्यांच्या परिवारांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! छठ मय्येच्या कृपेने सर्वांचे जीवन अलौकिक राहो.”
या बनावट रंगमंचाची तयारी करून शेवटी कार्यक्रम रद्द केल्यामुळे, छठपूजेच्या नावाखाली जनतेची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट दिसून आले. पीएमओने हा कार्यक्रम रद्द करून योग्य निर्णय घेतला, असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, आणखी एक वादग्रस्त घटना म्हणजे दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. पण तीन तास उलटूनही दिल्लीच्या कोणत्याच भागात पाऊस पडला नाही. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितले होते की १५ मिनिटांपासून चार तासांच्या आत पाऊस सुरू होईल, पण तसा झाला नाही. ही बातमी ‘आजतक’ने दिली आहे.आप पक्षाने या घटनेला “धोकेबाजीचा प्रकार” म्हटले आहे. सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की मेघांची पेरणी करून पाऊस पाडण्याचा बनावट प्रयोग करण्यात आला, पण तो निष्फळ ठरला. पर्यावरण विभागाच्या म्हणण्यानुसार, तापमान अपेक्षेपेक्षा तीन अंशांनी कमी असल्यामुळे कृत्रिम पाऊस यशस्वी झाला नाही.त्याचवेळी आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर चक्रवादळ येत होते आणि हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की त्याचा परिणाम दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. दिल्ली सरकारला वाटले असेल की चक्रवादळामुळे पाऊस होईल आणि त्यांनी त्याच निमित्ताने कृत्रिम पावसाचा प्रयोग दाखवण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीमध्ये दिवाळीनंतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ते कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस हा एक पर्याय म्हणून मांडण्यात आला होता. पण ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी जाणार होते ती यमुना नदी बनावट ठरली आणि कृत्रिम पावसाचा प्रयोगही अपयशी ठरला.त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता “चातक पक्षाप्रमाणे” आकाशाकडे पाहत राहिल्या, पण एक थेंबही पाऊस पडला नाही. बनावट यमुना नदी तयार करणे आणि ढगांची पेरणीसाठी झालेला खर्च हा दिल्ली सरकारच्या निधीतून झाला, जो जनतेच्या कराच्या पैशातून आहे.
पत्रकार अशोक वानखेडे म्हणतात —
“रेखा गुप्ता यांनी स्वतःचे दागिने विकून हा खर्च केलेला नाही. हा दिल्लीच्या जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. हा पैसा योग्य ठिकाणी खर्च व्हायला हवा होता. पण असे बनावट कार्यक्रम पाहून दुःखच वाटते.”
बनावट यमुना नदी तयार करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीतील दुर्दैव आहे. सणाच्या दिवशी अशा बनावटपणाला स्थान नाही. कारण जिथे सत्य असते, तिथेच ईश्वर असतो; आणि जिथे बनावटपणा असतो, तिथे ईश्वरसुद्धा त्या घटनेपासून दूर राहत, हेच खरे सत्य आहे.
